Jobs in JDCC Bank Jalgaon 2019 | Jalgaon District Central Co-operative Bank Recruitment 2019-20

JDCC Bank Jalgaon Maharashtra → website -www.jdccbank.com

 

जळगाव जिल्ह्याच्या सर्व मराठी भाषिक, गरीब,गरजू उपेक्षित माणसांचा सर्वांगीण विकास व समृद्धी होण्याच्या दृष्टीने व सर्वच स्तरावरील जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी दि खान्देश डीस्ट्रीक्ट सेन्ट्रल को. ऑपरेटिव्ह बँकेची स्थापना दि.१९ मे १९१६ रोजी जळगाव येथील नामांकित वकील व प्रमुख प्रवर्तक मा. दत्तात्रय गोविंद जुवेकर व इतर सर्व समाज सेवक संचालक यांनी केली. दि.२७ मे १९१६ रोजी पूर्ण खान्देश जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नोंदणी झाली व सरकार नियुक्त पहिले ९ सदस्यांचे संचालक मंडळ अस्तित्वात आले. बँकेचे पहिले संचालक मा. दत्तात्रय गोविंद जुवेकर यांची नेमणूक करण्यात आली. बँकेचा व्यवसाय सुरु करण्याच्या दृष्टीने संस्था सभासद म्हणून बोदवड सह.सोसायटीने पहिला शेअर दि. ३१ जुलै १९१६ रोजी घेतला. सन १९१६-१७ मध्ये ३५ संस्था व ११२ व्यक्ती असे एकूण १४७ बँकेचे सभासद होते. वसूल भाग भांडवल रु. २६००० गोळा झालेले होते. बँकेची स्थापना झाली त्यावेळेस व्यक्ती व संस्था सभासद मिळून बँकेचे एकूण १४७ सभासद होते. सन १९५१ मध्ये ३२०२, सन १९६६ मध्ये ४५०३ तर नोव्हेंबर २०१५ रोजी बँकेची एकूण सभासद संख्या ७४५८ असून पैकी व्यक्ती सभासद संख्या २६२४ आहे. बँकेची पहिली शाखा सप्टेंबर १९२३ मध्ये पाचोरा येथे सुरु करण्यात आली. व सन १९३५ पर्यंत मुख्य कार्यालयासह बँकेच्या ८ शाखा कार्यान्वित झाल्या. बँकेने जून १९१९ मध्ये गव्हमेंट सर्वेन्ट को. ऑपरेटिव्ह सोसायटीचे इमारतीत रु.७५/- वार्षिक भाड्याने बँकेचे मुख्य कार्यालय सुरु केले. सन १९३२-३३ मध्ये बँकेने रु. ४९२३३/- खर्च करून स्वतःची मुख्य कार्यालयासाठी घडीव दगडाची बांधकाम केली. म्हणून जिल्हा बँक बोली भाषेत “दगडी बँक” म्हणून ओळखली जाते. १०० वर्षापूर्वी लावलेल्या इवल्याश्या रोपट्याचे आज बलाढ्य वटवृक्षात रुपांतर झालेले आहे. आज बँकेच्या स्वताच्या मालकीच्या ५० इमारती व ५ बखळ प्लॉट आहे. सन १९९० मध्ये बँकेने रु.२ कोटी ३२ लाख खर्च करून भव्य नाट्यगृहसाहित बँकेची प्रशासकीय इमारत बांधकाम केली. बँकेस भारतीय रिझर्व बँकेने दि.२८ मार्च २०१२ रोजी बँकिंग व्यवसाय परवाना दिलेला आहे. बँकेवर एप्रिल २००३ ते डिसेम्बर २००८ या कालावधीमध्ये प्रशासकीय राजवट होती.